Bihar Crime : बिहारमध्ये प्रयागराजसारखी घटना, तरुणांनी पाठलाग करून पंचायत प्रमुखाच्या पतीला घातल्या गोळ्या - CCTV Footage Viral
भोजपूर (बिहार) : बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध उमेश पाल हत्याकांडसारखीचं घटना घडली आहे. आज रविवार (दि. 14 मे)रोजी दिवसाढवळ्या अराहच्या बरहार ब्लॉकच्या पश्चिम गुंडी पंचायतीच्या प्रमुख, अमरावती देवी यांचे पती महेंद्र यादव यांची काही तरुणांनी मागे पळू-पळू गोळ्या घातल्या. त्यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये दाखवण्यात आले आहे की, कसे हल्लेखोरांनी कसे पतीचा पाठलाग केला आणि रस्त्याच्या मधोमध त्याला गोळ्या घातल्या. यावेळी आजुबाजूला लोक होते. मात्र, त्यांनी हा प्रकार पाहून यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. परंतु, यावेळी दोन तरुण पाठलाग करत पुढे गाडीवर चाललेल्या व्यक्तीला गोळ्या घालत असल्याचे या सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.