महाराष्ट्र

maharashtra

मोबाईल बॅटरीचा स्फोट

ETV Bharat / videos

Mobile battery explosion: मोबाईल दुरूस्तीच्या दुकानात मोबाईल बॅटरीचा स्फोट; ग्राहकासह दुकानदार किरकोळ जखमी - mobile repair shop Satara

By

Published : May 19, 2023, 1:38 PM IST

सातारा :मोबाईलची फुगलेली बॅटरी बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकाने बॅटरीशी छेडछाड केल्याने बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना कराड तालुक्यातील उंडाळे गावातील एका मोबाईल दुरूस्तीच्या दुकानात घडली आहे. या घटनेत ग्राहक आणि दुकानदाराला किरकोळ भाजले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. मोबाईलमधून काढलेल्या जुन्या बॅटरीशी ग्राहकाने छेडछाड केल्याने बॅटरीचा स्फोट झाल्याची माहिती दुकानदार सचिन भावके यांनी दिली. तसेच मोबाईलची बॅटरी फुगल्यास खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल जवळ बाळगू नये अथवा चार्जिंगला लावू नये, तात्काळ बॅटरी बदलावी, असे आवाहन मोबाईल दुरूस्ती करणाऱ्या तंत्रज्ञांनी केले आहे. फोनची बॅटरी दुरूस्त करताना हा स्फोट झाला आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार घडू शकतात. 

ABOUT THE AUTHOR

...view details