Anti Encroachment Action: अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या विरोधात दुकानदाराने जाळले साहित्य
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): वाळूज औद्योगिक परिसरातील जय मल्हार चौकात असलेली अतिक्रमणे काढण्याचे काम सिडको प्रशासनने सुरू केले आहे. यामुळे संतापलेल्या एका दुकानदाराने अतिक्रमण पथकासमोरच आपल्या दुकानातील सामान जाळून टाकले. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बापाची जमीन विकून दुकान टाकली. अशा व्याकुळतेने दुकानदार अतिक्रमण पथकाला सांगत होता. अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करत महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची घटना छत्रपती संभाजी नगर येथील मयूरबन कॉलनीत 29 जानेवारी, 2020 रोजी घडली होती. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी महिलांनी शिवीगाळ केली. मयूरबन कॉलनीमधील महापालिका शाळेशेजारील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. याआधी काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटाव पथकाने संपूर्ण अतिक्रमण हटवले होते. मात्र, पथक गेल्यानंतर पुन्हा अतिक्रमण झाल्याची माहिती समोर आली. यानंतर अतिक्रमण पथकाने पुन्हा या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी काही महिला पथकावर चालून आल्या. एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा: Lemon Price Increased: 1 लिंबू 10 रुपयांना; ऐन उन्हाळ्यात वाढले लिंबाचे भाव