महाराष्ट्र

maharashtra

धावत्या शिवशाही बस जळून खाक

ETV Bharat / videos

धावती शिवशाही बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानाने 25 प्रवासी सुखरूप - Bus Caught Fire

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 7:00 PM IST

Updated : Dec 10, 2023, 7:05 PM IST

नाशिक Shivshahi Bus Caught Fire : निफाड तालुक्यातील चांदोरी जवळील शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रविवारी बसला आग लागली. (Bus Caught Fire) शिवशाही बस क्रमांक एम एच 09, एफ एल 0477 ही नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना, इंजिनच्या बाजूने धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. वाहकाने तत्काळ सदरची बस थांबवून 25 प्रवासी खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शिवशाही बसच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली : सदरच्या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान, आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे, भाऊ कर्डिले, किरण वाघ यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळातच अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आली. चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळण्याची चर्चा परिसरात सुरू होती.

Last Updated : Dec 10, 2023, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details