Uddhav Thackeray Dasara Melava : मराठा समाजावर लाठीचार्जचा आदेश देणारा डायर कोण? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
Published : Oct 24, 2023, 9:04 PM IST
|Updated : Oct 24, 2023, 9:51 PM IST
मुंबई: Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Protest Manoj Jarange Patil) यांचं कौतुक केलंय. मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय, धनगरांना त्यांनी साथ (Uddhav Thackeray On Manoj Jarange Patil) दिली आहे, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्न होताच, पण तेव्हा मी मारहाणीचा आदेश दिला नव्हता. गद्दारांमध्ये हिम्मत असेल तर हा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. हा विषय राज्याकडे नसून, लोकसभेत सोडवावा लागेल. पोट कोणत्याही जातीचं असो ते भरायलाचा पाहीजे हे राज्यकर्त्यांचं काम असतं. मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देतो, ते अत्यंत समजुतदारपणानं आंदोलन करत आहेत, अशा शब्दात दसरा मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.