Maharashtra Political Crisis : शिवसैनिकांचा जनसागर लोटला, ठाकरे पितापुत्रांनी मानले आभार - Minister Eknath Shinde
मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर बुधवारी (दि. 22 जून) सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर त्यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडून पुन्हा मातोश्री या आपल्या घरी परतले. यावेळी ठिकठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले व त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. मातोश्री येथे पोहोचले. त्यावेळी मातोश्री या निवासस्थानी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. ती गर्दी व समर्थन पाहून उद्धव ठाकरे यांनी हात दाखवत सर्वांचे आभार मानले तर आदित्य ठाकरे यांनी आपल्या मोटारीच्या छतावरुन सर्वांना वज्रमुठ दाखवली व सर्वांचे आभार मानले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST