Shivrajyabhishek In Lal Mahal : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त केले जाते या वस्तूंचे पूजन, जाणून घ्या इतिहास - लाल महालात शिवराज्याभिषेक सोहळा
पुणे, 6 जून 1676 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. हा राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. यानंतर शिवाजी महाराजांनी सार्वभौम राज्य स्थापन केल्याची द्वाही दाहीदिशा पसरली होती. या ऐतिहासिक क्षणाची सदैव स्मृती राहावी या हेतूने दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती, त्यामुळे येथे देखील हा सोहळा भव्य रितीने साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची गाथा, विविध धान्य तसेच शस्त्रांची पूजा केली जाते. या मागे काय आहे इतिहास आहे आणि हे करणे का गरजेचे आहे हे आपण या व्हिडियोद्वारे जाणून घेणार आहोत