Ramdas Kadam Criticizes Uddhav Thackeray : शिवसेना नेते रामदास कदमांची सटकली; उद्धव ठाकरेंचा केला एकेरी उल्लेख - राहुल शेवाळे
मुंबई :कांदिवली शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षापासून चर्चेत असलेली घोषणा म्हणजे ५० खोके एकदम ओके. ठाकरे गटाने दिलेल्या या घोषणेमुळे आता त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. हायकोर्टाने या प्रकरणी त्यांना सुनावल्यानंतर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेवर टीका करताना रामदास कदम यांनी एकेरी भाषेत केला आहे.
ठाकरेंनी केले बदनाम :सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत बेफाम आरोप करत आहेत. तुझ्या बापाची तू बदनामी केली. तुझ्या बापाचा तू होऊ शकला नाही अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल गेल्यांने त्यांनी निवडणुक आयोगाचा बाप काढला. त्यामुळे राहुल शेवाळेंनी त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात यांना खेचले. ठाकरेंनी आमदार, खासदार नगरसेवकांचे रेट ठरवून बदनाम केले असा आरोप त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना समन्स :दिल्ली उच्च न्यायालयाने आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना १७ एप्रिलला सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचे संजय राऊत म्हणाले होते. शिंदे गटाला नाव आणि चिन्ह देणे हा न्यायाचा व्यवहार नाही, असे ते म्हणाले होते. त्याविरोधात शिंदे गटाचे खासदार शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.