Chandrakant Khaire Criticism बावनकुळे नवीन आहेत वाटत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची टीका - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची टीका
Chandrakant Khaire Criticism भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र बावनकुळे यांची खिल्ली उडवली. त्यांच्या बोलण्याची नक्कल करून दाखवत बावनकुळे यांनी जास्त बोलू नये, असे खैरे म्हणाले आहेत. सोबतच जनसंघाचा जुने निवडणूक चिन्ह दिवा होता, हेही विसरू नये. सूर्य मावळतो, मात्र दिवा तेवत राहतो. हेही बावनकुळे यांनी लक्षात ठेवावं, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. राणे यांच्यावर टीका नारायण राणे यांना कोणी मोठे केलं, हे राणे विसरले. त्यामुळे त्यांना जास्त बोलू नये, नाहीतर आम्ही ही शिवसैनिक आहोत. या शब्दात चंद्रकांत खैरे यांनी नारायण राणे यांना दम भरला. नारायण राणे यांनी बेकायदेशीर बांधकाम केला आहे. याबाबत त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, त्यांची खासदारकी रद्द करावी. त्याबाबत तक्रार करणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST