अखेर शिवसेना शिंदेंची झाल्याचं शिक्कामोर्तब, बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी केला जल्लोष - आमदार संजय गायकवाड
Published : Jan 10, 2024, 8:26 PM IST
बुलडाणाMLA Sanjay Gaikwad : आमदार अपात्रतेबाबत संपूर्ण राज्य आणि देशाचx लक्ष लागलं असल्याचा अखेर निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये शिवसेना पक्ष शिंदेंचा असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. (ShivSena of Shinde) निर्णय जाहीर होताच बुलडाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीनं भव्य आतिषबाजी, फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. (ShivSena Celebration) संपूर्ण शिंदे गटात आनंदाचं वातावरण दिसून आलं. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटाचा खरपूस समाचार घेतला. जे लोकं आम्हाला गद्दार म्हणत होते त्यांना ही एक मोठी चपराक आहे. तसेच आता त्यांचा व्हिप अमान्य झाल्यामुळं आता उवाठाच्या 14 आमदारांचं नेमकं काय होणार हे सांगण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले.