Uday Samant On Shinde Fadnavis : राज्यात पुढील पंचवीस वर्षे शिंदे-फडणवीस सरकार - उद्योगमंत्री उदय सामंत - उद्योग मंत्री उदय सामंत
पुणे :राज्यात पुढील पंचवीस वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राहणार असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राज्यात सत्ता स्थापन करून उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करून भारतीय जनता पक्षासह राज्यात सत्ता स्थापन केली होती. या वर्षभरात विरोधक शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करीत आहे. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, शिंदे फडणवीस सरकार पुढील पंचवीस वर्ष राहणार असल्याचा दावा उद्योगमंत्री सामंतांनी केला आहे. राज्यातील रोजगार, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, नवीन प्रकल्प राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित झाल्याबद्दल सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.