महाराष्ट्र

maharashtra

फिरते स्वच्छतागृह

ETV Bharat / videos

She Van Toilet : महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता फिरते स्वच्छतागृह; राज्यातील पहिलाच प्रयोग - प्रसाधनगृहाचे उदघाटन

By

Published : Jun 15, 2023, 10:39 PM IST

चंद्रपूर: बंदोबस्तात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची अडचण होऊ नये यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. भंगार झालेल्या वाहनाचे स्वछतागृह तयार करण्यात आले आहे. राज्यातील असा हा पहिलाच प्रयोग आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या संकल्पनेतुन हा प्रयोग करण्यात आला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सण, उत्सव व यात्रा दरम्यान महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात येतो. मात्र त्यावेळी महिला पोलिसांना शौचास जाण्यासाठी कसलीही सुविधा उपलब्ध नसते. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी मोटर परिवहन विभागातील नादुरुस्त असलेल्या चारचाकी वाहनांचे रूपांतर स्वच्छता गृहासाठी केला आहे. 

अशी झाली she van ची निर्मिती :  या वाहनात 2 टॉयलेट, 1 वॉशरूम, पाणी व फॅनसहित चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. She Van म्हणजेच फिरते प्रसाधनगृह म्हणून याचा वापर जिल्ह्यात बंदोबस्तात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याना करता येणारआहे. ही सुविधा सुरू झाल्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही, नुकतेच या फिरत्या प्रसाधनगृहाचे उदघाटन पोलीस अधीक्षक परदेशी, प्रीती रविंद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर जुन्या वाहनाला SHE VAN मध्ये नूतनीकरण करण्यासाठी 3 ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात 700 ते 800 महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details