महाराष्ट्र

maharashtra

शरद पवार

ETV Bharat / videos

Sharad Pawar On Cast Wise Census : जातीनिहाय जनगणनासंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले... - जातिनिहाय जनगणनेवर शरद पवारांचे मत

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 10:21 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) : Sharad Pawar On Cast Wise Census :भारतीय भटके विमुक्त समाज (Indian Nomadic Society) यांच्या मार्फत आज (सोमवारी) शरद पवार (Sharad Pawar) यांचा मानपत्र अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवारांनी देशात भटके विमुक्त समाजाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. (Sharad Pawar Pimpri Chinchwad Tour) यापूर्वी या समाजातील काही घटकांना आरोपी समजून तर काहींना गुन्हेगार ठरवून त्यांना बंदिस्त केले जात होते; परंतु स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः सोलापूरला आले आणि त्यांनी त्या तारा कापून आजपासून तुम्ही मुक्त आहात, असे म्हटले होते. मात्र, सध्या प्रश्न अनेक आहेत. आताच्या राज्यकर्त्यांना ते सोडायचे का नाही, अशी शंका वाटते म्हणत शरद पवारांनी राज्य तसेच केंद्रावर निशाणा साधला आहे. तर देशात जातीनिहाय जनगणना होण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले होते. पक्षातील फुटीनंतर ते पहिल्यांदाच शहरात आले आहेत. यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत करत त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. दरम्यान, भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना जाणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केल्याने भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाच्या वतीने शरद पवार यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details