महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar

ETV Bharat / videos

Sharad Pawar : शरद पवार पुण्यात दाखल, कार्यकर्त्यांकडून जल्लोष - Sharad Pawar as President of NCP

By

Published : May 5, 2023, 10:53 PM IST

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील ३ दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट आज झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच कायम राहणार असल्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. पवार हे उद्यापासून दोन दिवसीय सोलापूर, सातारा दौऱ्यावर असून ते आज पुण्यातील मोदीबाग येथे आल्यावर पक्षातील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून ढोल ताशा वाजवत जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पवार यांच्या बरोबर रोहित पवार हे देखील उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांनी त्यांचा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. ते आज मुंबईतील यशंवतराव चव्हान सेंटर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोक माझे सांगाती आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन वेळी अध्यक्ष पदावरुन निवृ्त्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उलथली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details