Sharad Pawar : शरद पवारांनी गोविंदबागेत कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा, शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा! - पवार कुटुंबीय
Published : Nov 14, 2023, 2:16 PM IST
बारामती Sharad Pawar :देशभरात अनेक मान्यवर कुटुंबीय आपापल्या परीनं दिवाळी पाडवा साजरा करतात. मात्र बारामतीतील गोविंद बाग येथे संपूर्ण पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा सण अनेक अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो. पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश विदेशात वास्तव्यास असतात. त्यामुळं सर्वांची एकत्रित भेट व्हावी यासाठी, मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळीनिमित्त एकत्रित येत पाडव्यासह दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सवात साजरा करतात. दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय नागरिकांसह कार्यकर्त्यांना भेटत असतात. तसंच शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी व दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, कलाक्रीडा, आदी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक जण गोविंद बागेत दाखल होत असतात. अनेक वर्षांची ही परंपरा सुरू असून आजही पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत पवार समर्थकांची गर्दी झाली आहे. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार व शरद पवार हे दोन्ही गट एकसंध राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.