Sharad Pawar News : शरद पवारांनी काय केलं 'हे' पंतप्रधानांना माहीत नसेल, तर याची मला लाज वाटते - शांतीलाल सुरतवाला
Published : Oct 27, 2023, 4:02 PM IST
पुणे Sharad Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेत टीका केली होती. महाराष्ट्रात काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यानं देशाचं कृषिमंत्री म्हणून काम पाहिलं. मी वैयक्तिकरित्या त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी पवारांचं नाव न घेता विचारला होता. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान काहीही करू शकतात. शेतकऱ्यांसाठी सर्व काही शरद पवारांनी केलं. पंतप्रधानांना शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी काय केलं, ते माहीत नसेल तर मला लाज वाटते, अशी टीका शांतीलाल सुरतवाला यांनी केलीय. एवढ्या मोठ्या नेत्याला अजित पवारांसमोर वाईट बोलू नये एवढं देखील पंतप्रधानाना कळत नाहीये. अजित पवारांनाही याबद्दल वाईट वाटलं असेल, मात्र त्यांनी पंतप्रधानाचं वक्तव्य सहन केलं.