महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar

ETV Bharat / videos

Sharad Pawar : शरद पवार मराठा की ओबीसी?, पाहा शाळा सोडल्याचा दाखला - School Leaving Certificate of Sharad Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 10:53 PM IST

पुणे Sharad Pawar:गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच मराठा विरुद्ध ओबीसी सुप्त वाद सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच प्राध्यापक नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ओबीसी असल्याचा उल्लेख केलाय. त्यावरुन राजकारण तापलं आहे. यानंतर शरद पवार ओबीसी आहेत की मराठा, अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. त्याचवेळी पवारांचे समर्थक विकास पासलकर यांनी शरद पवार यांच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत दाखवून टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. तसंच त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तरुणांची माथी भडकावून दोन समाजात भांडण लावलं जात असल्याचं देखील ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details