Sharad Pawar Resignation : माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातली नाही; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांचे शेवटचे शब्द, पाहा व्हिडिओ - शरद पवार
मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. या सर्वांनी मिळून शरद पवार यांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत तुम्ही हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही, असा इशाराही यावेळी दिला. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांनी यावेळी भावूक कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, अनिल देशमुख इत्यादी उपस्थित पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी देखील शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली.