Sharad Pawar : शरद पवारांकडून गिरीश बापट यांच्या तब्बेतची विचारपूस - Sharad Pawar
पुण्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट BJP leader Girish Bapat हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू Treatment on Girish Bapat at Dinanath Hospital आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट हे एकत्र आले. तेव्हा पवारांनी बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या रौप्यमोहत्सवी वर्षानिमित्त आयोजित विश्वस्त परिषदेला आज पुण्यात खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दोघेही उपस्थित होते. या कार्क्रमाला शरद पवार पोहचले तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि गिरीश बापट आधीच उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST