महाराष्ट्र

maharashtra

प्रशांत जगताप

ETV Bharat / videos

Prashant Jagtap On PM Modi: पुरस्काराबाबत नव्हे तर मणिपूरच्या घटनेवरून नरेंद्र मोदींचा विरोध करणार - प्रशांत जगताप - NCP will oppose PM Modi

By

Published : Jul 31, 2023, 5:01 PM IST

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर असून त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. एकीकडे मणिपूर पेटत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान पुण्यात येत आहेत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. पण असे असले तरी पवार हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. दुसरीकडे शरद पवार गट तसेच विरोधकांकडून उद्या पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन त्या संस्थेच्या पुरस्काराच्या विरोधात नाही. तर मणिपूर, जे गेल्या 80 दिवसांपेक्षा जास्त काळापासून पेटते आहे, त्या विरोधात असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. एकूणच जगताप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...पाहूया

ABOUT THE AUTHOR

...view details