महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विश्वजीत कदम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पडले पाया; पाहा व्हिडिओ - Sharad Pawar

By

Published : Jan 8, 2023, 5:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

पुणे आज पुण्यात डॅा. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त Dr Patangrao Kadam Jayanti Programme Inauguration भारती सुपरस्पेशालिटी हॅास्पिटल आणि स्टुडंटस् हौसिंग कॅाम्पेक्सच्या उद्घाटन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम Vishwajit Kadam यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचे स्वागत करताना पाया पडले. विश्वजीत कदम यांच्या या कृत्याने संस्कृतीचे दर्शन घडले आहे. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार Sharad Pawar हे होते. तर याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावर्षीचा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात होण्याआधी भारती विद्यापीठ परिसरात खासदार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या गाडीतून एकत्र प्रवास करत संस्थेची पाहणी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details