महाराष्ट्र

maharashtra

Nalanda Blast

ETV Bharat / videos

Nalanda Blast: बिहार नालंदामध्ये बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ! २ जण जखमी - नालंदा येथे बॉम्बस्फोट

By

Published : Apr 22, 2023, 8:44 PM IST

नालंदा :बिहारमधील नालंदा येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचे प्रकरण समोर आले आहे. गेल्या महिन्यातच रामनवमीनंतर नालंदा हिंसाचारात पेटला होता. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाभरात अनेक ठिकाणी कारवाई केली असून, अनेकांना ताब्यातही घेतले आहे. आता पुन्हा एकदा स्फोटाच्या घटनेमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या स्फोटात दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बिहार शरीफ येथील पहारपुरा भागातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी ही घटना अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांचा हात असल्याचे मानले जात आहे. तरीही पोलीस प्रशासनाने या संदर्भात काहीही स्पष्ट केलेले नाही. ही घटना सुतली बॉम्बस्फोटासारखी वाटते. दुसरीकडे, काही लोकांचे म्हणणे आहे की, काही लोक बॉम्ब बनवत होते, त्याच दरम्यान हा स्फोट झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details