सूर्यनमस्कार घालत सातशे विद्यार्थ्यांनी केलं नववर्षाचं स्वागत - greeted New Year
Published : Jan 1, 2024, 2:45 PM IST
नंदुरबार : ननववर्षाच्या स्वागतानिमित्त शहरातील श्रॉफ हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले. शाळेतील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत सामूहिक सूर्यनमस्कार केले. शाळेच्या प्रांगणात गोलाकार करुन दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी न चुकता नववर्षाचं स्वागत करतात. 2006 पासून नंदुरबार श्रॉफ विद्यालयाने हा उपक्रम सुरु केला होता. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येतो. बासरीची सुमधुर धून आणि यात योगाद्वारे नववर्षाचे स्वागत यातून वर्षभर आरोग्य समृद्धीचा संदेश या विद्यार्थ्यांकडून दिला जातो. कार्यकमाचे प्रमुख अतिथी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं की, "भारतीय योग विद्येला जगाने स्वीकारलं आहे. शारीरिक, मानसिक विकास, चित्त एकाग्रता, विविध ग्रंथी सक्रिय होण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहे. हा उपक्रम श्राॅफ हायस्कूलने राबवून प्रेरणादायी कार्य निरंतर सुरू ठेवलं आहे.