Video : पक्षावरील संकट दूर करण्यासाठी सेने नेते चंद्रकांत खैरे यांनी केली पूजा - Chandrakant Khaire Prayed To South Facing Maruti
औरंगाबाद - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या हस्ते होणारी पूजापाठ काही नवीन नाही. पक्षावर आलेलं संकट असो की एखादी निवडणूक, तर कधी पक्षातील नेत्यांचं आरोग्य यासाठी खैरे साहेब यांनी पूजा केलीच म्हणून समजा. त्यांनी अशीच एक पूजा केली आहे. ती देखील पक्षावर आलेले एकनाथ शिंदे नावाचं ( CM Eknath Shinde )संकट दूर व्हाव म्हणून. राज्यात बंडखोर गद्दार आमदार व खासदार यांनी शिवसेनेशी दगाबाजी केली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धैर्याने व संयमाने या संकटाला सामोरे जात आहे. लवकरच शिवसेना पक्षावरील संकट टळू दे, यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दक्षिणमुखी मारुतीकडे ( Dakshinmukhi Maruti ) प्रार्थना केली. दौलताबाद येथील प्रसिद्ध दक्षिणमुखी ( Daulatabad Dakshinmukhi Maruti ) व नवगृह मंदिरात महायज्ञाचे आयोजन केले होते. ११ ब्रह्मवृदांच्या उपस्थितीमध्ये वेदशास्त्र संपन्न केले. कुष्णाकांत मुळे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली हे नियोजन करण्यात आले होते. या पुजेमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मौन धारण करत जवळपास दहा तास पूजा केली. सर्वोच्च न्यायालय, विधिमंडळ आणि संसदेत शिवसेनेच्या बाजूने निकाल लागतील असा विश्वास यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Sena leader Chandrakant Khaire ) यांनी व्यक्त केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST