महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rakshabandhan 2022 : स्व हाताने तयार केलेल्या राख्या सैनिकांसाठी सिमेवर; इंदिरा गांधी विद्यालयाचा स्तुत्य ऊपक्रम - Rakshabandhan 2022

By

Published : Aug 7, 2022, 5:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

धरणगाव येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या (Indira Gandhi High School Students) वतीने गेल्या 22 वर्षापासून, देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती (Self Made rakhis sent for soldiers) बंधुप्रेमाची भावना जपण्यासाठी; रक्षाबंधन (Rakshabandhan 2022) या सणाच्या पार्श्वभूमीवर अनोखा उपक्रम राबविण्यात येतो. शाळेतील विद्यार्थिनी स्वखर्चाने राखीसाठी लागणारे विविध रंगांचे कॉटन , लोकरचे धागे आदी साहित्य आणतात. हा उपक्रम दहावीच्या वर्गामार्फतच राबवला जातो. शाळा सुरू होण्याच्या एक तास अगोदर किंवा शाळा सुटल्यावर विद्यार्थिनींकडून राख्या बनवून घेतल्या जातात. राख्या बनवतांना तिरंगा धाग्याचा जास्त उपयोग करण्यात येतो. देशाच्या सीमेवर रक्षा करणारे सैनिक जवान हे रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी आपल्या बहिणी जवळ घरी येऊ शकत नाहीत, याकरिता आम्ही विद्यार्थिनी एकत्र येऊन सैनिकांना राख्या पाठवितो. यात आम्हाला आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया विद्यार्थांनी व्यक्त केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details