Cyclone Beeperjoy: 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेटवे परिसरात सुरक्षा तैनात - cyclone Beeperjoy latest update
मुंबई : अरबी समुद्रात आलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. या वादळामुळे समुद्राला उधाण आले आहे. मुंबईच्या किनारपट्टी भागात उंच लाटा उसळत आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्रीकिनारी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहेसमुद्रात जाऊ नये, असे आवाहन मच्छीमारांना यावेळी करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून समुद्रकिनारी एनडीआरएफ, पोलीस, मुंबई महापालिका, कोस्टल गार्ड, लाइफ गार्ड यांची सुरक्षा तैनात केली आहे. या वादळाचा तितकासा परिणाम राज्यातील समुद्री किनाऱ्यावर होतं नसला तरी वाऱ्यामुळे उंच लाटा उसळत आहेत. गेट वे परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गेट वे परिसरात वादळाच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे, लाटांनी थैमान घातले आहे. समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लाटा उसळताना दिसत आहे.