महाराष्ट्र

maharashtra

संपादित छायाचित्र

ETV Bharat / videos

SDRF Rescues Youth In Kedarnath : केदारनाथला स्टंट करणे आले अंगलट; सुमेरु पर्वतावर अडकलेल्या तरुणाची एसडीआरएफकडून थरारक सुटका - बर्फाचा थरार

By

Published : May 27, 2023, 1:59 PM IST

केदारनाथ : काहीतरी विशेष अन् हटके करण्याच्या नादात एका पर्यटकाच्या भलतेच अंगलट आले आहे. केदारनाथ दर्शनाला आलेल्या या पर्यटकाने सुमेरू पर्वताच्या बर्फावर गेल्यानंतर तो पर्वताच्या बर्फावरच अडकून पडल्याने चांगलीच खळबळ उडाली. मात्र केदारनाथ पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने या पर्यटकाची सुटका केली. सचिन गुप्ता असे त्या पर्वतावर अडकलेल्या पर्यटकाचे नाव असून सचिन वृंदावनचा रहिवासी आहे. केदारनाथच्या दर्शनासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील सचिन गुप्ताने शुक्रवारी सकाळी केदारनाथ मंदिरातून प्रथम भैरवनाथ मंदिरात गेला. तिथून बर्फाचा थरार अनुभवत तो डोंगरावर चढत गेला. सचिन सुमेरू पर्वतावर कधी पोहोचला हेही त्यालाही कळले नाही. सुमेरू पर्वतावर खूप बर्फ पडला होता. तेथे गेल्यानंतर सचिन गुप्ता बर्फात अडकला. ना पुढे जाण्याची संधी होती ना परत येण्याची परिस्थिती निर्माण होती. सचिन केदारनाथ मंदिरापासून चार किलोमीटर वर पोहोचला होता. 6 फुटांपेक्षा जास्त बर्फ साचल्याने सामान्य उंचीचा माणूस त्या बर्फात झाकून गेला असता. खूप प्रयत्न करूनही सचिन गुप्ता परत येऊ शकला नाही, तेव्हा थकल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफने सुमेरू पर्वताच्या शिखरावरून सचिनची सुटका केली. सध्या सचिनला केदारनाथ धाम येथील विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details