महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 30, 2022, 7:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ETV Bharat / videos

Short Film 'स्क्रीन ॲडिक्शन' विद्यार्थ्यांनी बनवली अफलातून शॉर्ट फिल्म; मोबाईलच्या वापराने बदललेलं वातावरण...

कॉलेज म्हंटले की प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. कॉलेजचे जीवन प्रत्येकाने आपल्या हृदयात साठवून ठेवले असते. मात्र सद्या विद्यार्थ्यांचे मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हणूनच यावर कोल्हापूरातील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर शॉर्ट फिल्म बनवली आहे. ज्यामध्ये मोबाईलच्या वापरामुळे कॉलेज आवारात जे दृश्ये आधी दिसायची ती नाहीशीच झाली आहेत. एवढेच काय तर याच मोबाईलच्या वापरामुळे अनेक अपघात घडत आहेत. एका रिपोर्ट नुसार दरदिवशी प्रत्येकजण 5 ते 6 तास मोबाईलवर असतात. 'स्क्रीन ॲडिक्शन' नावाने त्यांनी ही शॉर्टफिल्म Screen Addiction Short Film बनवली असून त्यांच्या या फिल्म ला एका नॅशनल स्पर्धेत दुसरा क्रमांक सुद्धा मिळाला आहे. पाहुयात नेमकी काय आहे ही शॉर्ट फिल्म...
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details