ऑटोरिक्षा आणि ट्रक यांच्यात भीषण धडक, आठ शाळकरी मुलं जखमी; पाहा घटनेचा थरारक Video - ट्रकनं मुलांच्या ऑटोरिक्षाला धडक दिली
Published : Nov 22, 2023, 3:55 PM IST
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) School Auto Truck Accident : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे बुधवारी शाळकरी मुलांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. या धडकेत आठ शाळकरी मुलं जखमी झाली आहेत. शहराच्या संगम शरत थिएटर चौकात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं मुलांच्या ऑटोरिक्षाला धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लिनरने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणामुळे ही टक्कर झाली. पाहा धडकेचा हा थरारक व्हिडिओ.