SC Hearing on Shivsena : शिवसेना पक्ष अन् चिन्हावर 'सुप्रीम सुनावणी'; पाहा काय म्हणाले घटनातज्ज्ञ
Published : Sep 18, 2023, 12:56 PM IST
पुणे : SC Hearing on Shivsena : गेल्या दीड वर्षापासून शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावण्या पार (Supreme Court Hearing On Shivsena Name Party logo) पडणार आहेत. त्यामुळं राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडं (Supreme Court) लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण चिन्हावर खरा अधिकार कुणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, या सर्व गोष्टींचा परिणाम देशाच्या लोकशाहीवर होत आहे. याकडं कायदेतज्ज्ञ आणि घटनातज्ज्ञांनी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे तो शिंदे गटाच्या बाजूनं आहे. निवडणूक आयोगानं मूळ जो पक्ष आहे त्याचा कोणताही विचार केलेला नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. ती वाढली पाहिजे आणि यावर चर्चा व्हायला पाहिजं.