Rainfall In Pune: पुण्यात चालू आठवड्यात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज - Satisfactory rain likely in Pune
पुणे : राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या स्थिर स्थितीमध्ये आहे. कोकणचा उत्तर भाग व उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील या भागाला पावसाचा 'रेड अलर्ट' देण्यात आलेला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आज आकाश पूर्णपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट भागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली जात आहे. 23 तारखेला आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी जोरदार व मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही घाटात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 24 जुलैला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे जाणवत आहेत. आठवड्याच्या शेवटी सुद्धा काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात ह्या महिन्यामध्ये असमाधानकारक पाऊस झाला. प्रत्येकवर्षी पावसाळ्यात चारही धरणे भरलेली असतात; परंतु यावर्षी म्हणावा तसा पाऊस नसल्याने आणखी धरणे क्षमतेनुसार भरलेली नाहीत.