Kas Dam Video : सातारकरांची तहान भागविणाऱ्या कास धरणाचे महिला पदाधिकाऱ्यांनी केले ओटी भरण - Satara Municipality
Kas Dam : सातारकरांची ( Satara ) तहान भागवणाऱ्या कास धरणात ( Kas Dam ) मुबलक पाणीसाठा ( water reservoir ) झाला असून सातारावासियांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यानिमित्ताने सातारा नगरपालिकेच्या ( Satara Municipality ) आजी- माजी महिला पदाधिकाऱ्यांनी कास धरणाच्या जलाशयात साडी- चोळी आणि श्रीफळ अर्पण करून कास धरणाचे ओटी भरण केले आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा रंजना रावत, माजी आरोग्य सभापती अनिता घोरपड़े, माजी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, सुजाता राजेमहाडिक, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी पक्ष प्रतोद दत्ता बनकर, राम हादगे, श्रीकांत आंबेकर उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST