महाराष्ट्र

maharashtra

शेख महंमद महाराजांची दिंडी

ETV Bharat / videos

Ashadhi Ekadashi 2023: श्रीगोंद्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; संत श्री महंमद महाराजांच्या दिंडीने पंढरपूरकडे केले प्रस्थान - श्रीगोंद्यात हिंदू मुस्लिम ऐक्य

By

Published : Jun 20, 2023, 11:21 AM IST

अहमदनगर :जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील संत श्री महंमद महाराजांच्या दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शेख महंमद महाराजांची दिंडी यंदा पहिल्यांदाच पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. संत महंमद महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे समकालीन सुफी संत होते. या दिंडीत जवळपास दोन हजार भाविकांनी सहभाग घेतला आहे. यंदा प्रथमच दिंडी जात आहे. मात्र, पुढच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या अधिक राहू शकते, असे आयोजकांचे म्हणणे आहे. एकीकडे राज्यात आणि देशात हिंदू-मुस्लिम वादाच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे अशा पद्धतीने एका मुस्लिम सुफी संतांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असल्याने समाजापुढे एक नवीन आदर्शच या निमित्ताने ठेवला गेला आहे. यावेळी सकाळी मान्यवरांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले. त्यानंतर शेख महंमद महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून हरिनामाचा जयघोष करत पालखी मार्गस्थ झाली. गेले काही दिवसांपासून समाजात तेढ निर्माण होतील, अश्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या वातावरणात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शेख महंमद महाराज यांची पायी दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details