राऊत ईडीच्या ताब्यात! घरातून निघण्यापूर्वी घेतले आईचे आशिर्वाद; पाहा व्हिडिओ - Before reaching the ED office Raut took the blessings of his mother
मुंबई - शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अखेर ताब्यात घेतले आहे. आज रविवार (दि. 31 जुलै)रोजी सकाळपासून त्यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. तत्पूर्वी, संजय राऊत यांनी घरातून निघताना आपल्या आईचे आशिर्वाद घेतले. त्यांनी आपल्या आईला मिठी मारून आपल्यावर झालेल्या कारवाईबद्दल एक आत्मविश्वास दिला. हा एक भावनिक क्षन आहे. तो व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. आज सकाळपासून संजय राऊत ( ED action on sanjay Raut ) यांची चौकशी सुरू होती. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) भांडूप येथील घरी ही चौकशी सुरू होती. ईडीने यापूर्वी ( ED Officers ) दोनदा समन्स बजावले होते. त्यामध्ये एकवेळा राऊत यांची चौकशीही झाली होती. ईडीची कारवाई सुरु असतानाच संजय राऊत यांनी लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST