महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2022, 7:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ETV Bharat / videos

Sanjay Raut : संजय राऊत आता अजून आक्रमक होतील - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद - संजय राऊत यांच्या जमिनामुळे ( Sanjay Raut granted bail ) आनंदी असून ते आता मोठ्या ताकतीने विरोधकांवर तुटून पडतील अस वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी केलं. दिपाली सय्यदला पक्षात पद लागत होत. ते मिळालं नाही त्यामुळे ती दुसरीकडे चालली आहे असेही ते म्हणाले. न्यायालयात न्याय मिळाला. यांच्या खोट्या गोष्टी उघड पडल्या आहेत. वीस वर्ष खासदार असणाऱ्या मोठ्या व्यक्तीला त्यांनी अशा पद्धतीने त्रास दिला आहे. आमच्या मनातील राग कधीही शांत होणार नाही. संजय राऊत एकनिष्ठ राहिले, त्यांच्यावर किती दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते घाबरले नाहीत त्याचा विजय झाला आहे. हे तर खोके घेऊन पसार झाले. मात्र राऊत साहेब यांनी आधीच सांगितलं होत की झुकणार नाही म्हणून, ते घाबरले नाहीत. ईडी शेवटापर्यंत त्रास देत राहणार असे म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details