Sanjay Raut Released गर्दी पाहून हीच बाळासाहेबांची शिवसेना, संजय राऊत यांची जेल बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया - शिवसेनेचे खासदार
Sanjay Raut Released मुंबई शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी केवळ 10 मिनिटात निकाल देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असून या प्रकरणाची सुनावणी उद्या घेण्यात येणार आहे. शिवसेनेचे खासदार 102 दिवसांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर पडलेले आहेत. आज जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यानंतर जमलेल्या असंख्य शिवसैनिकांनी संजय राऊत यांचे गुलालाची उधळण आणि फटाक्याच्या आताषबाजी करून स्वागत केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST