Sanjay Raut criticized Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांचे किती विठ्ठल आहेत? संजय राऊत यांचा खोचक प्रश्न - Sanjay Raut criticized Chhagan Bhujbal
नाशिक : छगन भुजबळ यांनी गद्दारी केल्यानंतर त्यांचा पराभव होतो. हा सर्वांनाच अनुभव आहे. आम्ही त्यांचा दोनदा पराभव केला आहे. यंदा देखील त्यांचा येवल्यातून पराभव अटळ असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. संजय राऊत हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावेळी बोलताना ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी त्यांचे विठ्ठल किती आहेत, हे स्पष्ट करावे. एकदा बाळासाहेब ठाकरेंना सोडले, दुसऱ्यांदा शरद पवारांना सोडले. गद्दारी, बेईमानी करणे आणि विठ्ठल बदलण्याची सवयच जणू काही भुजबळ यांना झाली आहे. रस्त्याला मोठे खड्डे असल्यामुळे अजित पवार यांनी ट्रेनमधून नाशिकला आले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मंत्री दादा भुसे यांचा गिरणा मोसम साखर कारखान्याप्रकरणी चौकशी केव्हा होणार? असा सवाल खासदार राऊत यांनी केला. भुसे यांनी 178 कोटींचा हा घोटाळा केलेला आहे. जनतेची अक्षरशः लूट केली आहे. त्याचबरोबर राहुल कुल आणि विखे पाटील यांनीही केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी खासदार राऊत यांनी केली.