Sanjay Raut On Eknath Shinde : नपुंसक कांदे खातो, शिंदे गटाच्या दसरा मेळ्याव्यावरून संजय राऊत यांची टीका - शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे
Published : Oct 24, 2023, 7:24 PM IST
मुंबई Sanjay Raut On Eknath Shinde:बाडगा अधिक जोरानं बांग देतो, तर नपुंसक अधिक कांदे खातो, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना शिंदे गटाचा हा मेळावा पैशाच्या जोरावर करण्यात येत आहे. पुढच्या वर्षी जेव्हा, ते मुख्यमंत्री नसतील तेव्हा हा मेळावा सुद्धा होणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. दसऱ्यानिमित्त आज मुंबई शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे होत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा हा बनावट मेळावा आहे, तो मेळावाच नाही. आता शिंदे यांच्याकडं प्रचंड पैसा आहे. त्या पैशाच्या जोरावर मेळावा घेत आहेत. पुढील वर्षी जेव्हा ते मुख्यमंत्री नसतील, तेव्हा मेळावा होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.