Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी, आम्ही त्यांची वाट पाहत आहोत, ते परत येतील - संजय राऊत - एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई - एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे ( Sanjay Raut on Eknath Shinde ) सर्व आमदारांसह परत येतील, अशी आपल्याला खात्री असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on Eknath Shinde ) म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक सायंकाळी वर्षा निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST