महाराष्ट्र

maharashtra

संजय गायकवाड

ETV Bharat / videos

Open Challenge: संजय गायकवाड यांचे संजय राऊत यांना ओपन चॅलेंज; एकदा मुंबईत समोरासमोर होऊन जाऊ द्या - प्रकाश आंबेडकर

By

Published : May 26, 2023, 10:32 PM IST

बुलडाणा : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत आणि संजय गायकवाड यांच्यात अनेकवेळा कलगीतुरा रंगलेला पाहतो. आरोप प्रत्यारोप, उत्तर प्रतिउत्तर, दावे प्रति दावे या दोन्ही नेत्यांकडून केले जातात. पण आता थेट संजय गायकवाड यांनी मुंबईत येऊन आपण संजय राऊत यांचे ओपन चॅलेंज देत स्वीकार करू. त्यांच्यातला चोंबडेपणा आपण बंद करू किंवा त्यांनी उत्तराला उत्तर द्यावे, असे चॅलेंज दिले आहे. तसेच पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला सल्ला त्यांनी ऐकावा आणि काँग्रेस राष्ट्रवादीपासून दूर व्हावे, त्यांना बळी पडू नये, असा पुनरुच्चार केला आहे. आमच्या तर जागा वाढणारच आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला किती जागा देते, याचे आत्मपरीक्षण तुम्ही करावे असाही उपरोधिक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. तसेच राष्ट्रपती यांना देशातील भाजप शिवसेना पक्षाने एकमताने निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत आम्ही निर्णय योग्य घेतला आहे. आता त्यांच्याबाबत टीका टिपणी इतर पक्षांनी करू नये. असाही इशारा त्यांनी दिला आहे. तर एकंदरीत पुन्हा एकदा संजय राऊत आणि संजय गायकवाड यांच्या चांगला कलगीतुरा रंगत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details