Same Sex Marriage : 'समलैगिंक विवाहाला मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा फोल ठरली' - Same sex Marriage Case
Published : Oct 17, 2023, 10:59 PM IST
मुंबईSame Sex Marriage : 2018 पासून सुरू झालेला समलिंग विवाहाला मान्यता देण्याच्या याचिकाच्या लढा आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेला आहे. समस्या निकालात निघाली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने समलिंगी विवाहाला मान्यता न देता तो निर्णय संसदेवर सोपवला. त्यामुळे भारतभर त्याच्या समर्थकांना धक्का बसला आहे. भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून या संदर्भात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
निकालामुळे अपेक्षा फोल ठरली : ज्येष्ठ वकील निशा शिवरकर यांनी म्हटलेलं आहे की, आमच्यासारख्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळींची सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपेक्षा फोल ठरलेली आहे. कारण समलिंगी विवाह करणाऱ्यांना जोडीदार म्हणून मान्यता मिळणे. तसेच त्यांना मूल दत्तक घेण्यासंबंधी आणि संपत्ती खरेदी करण्यासंबंधी अनेक अधिकार मिळणे, अशा या मागण्या यामध्ये होत्या. परंतु पाच पैकी तीन न्यायाधीशांचे मत विरोधात आणि मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud)आणि दुसरे न्यायाधीश एस के. कौल यांनी बाजूने निर्णय दिला. परंतु बहुमत विरोधात गेल्यामुळे हा निर्णय संसदेवर सोपवला. त्यामुळे आमची सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत अपेक्षा फोल ठरली आहे.