Sahyadri Krida Mandal Ganapati: श्रीकृष्णाच्या गोकुळ नगरीत अवतरला सह्याद्रीचा गणपती बाप्पा, पाहा व्हिडिओ - सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती देखावा
Published : Sep 24, 2023, 5:44 PM IST
मुंबईSahyadri Krida Mandal Ganapati : सह्याद्री क्रीडा मंडळ 47 वे गणेशोत्सवाचे वर्ष साजरं करतंय. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या मंडळानं नेत्र दीपक सजावट साकारलीय. हे गणेशोत्सव मंडळ भव्य दिव्य आणि शिस्तबद्धतेसाठी ओळखलं जातं. या गणेशोत्सव मंडळानं त्यांच्या कल्पनेतील श्रीकृष्ण रमणाऱ्या गोकुळातील रम्य बागेत बाप्पाला विराजमान केलंय. (Ganapati in Krishna Temple Gokul scene) श्रीकृष्णास आवडणाऱ्या मोरपंखापासून स्टेजवर सजावट केलीय. ती अतिशय सुंदर आहे. त्यामध्येच गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती ठेवण्यात आलीय. त्याचप्रमाणे मूर्तीवर असलेले सोन्याचे आकर्षक दागिने भाविकांचं लक्ष वेधून घेतात. भाविक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं येतात. गणेशभक्त कोणतीही धक्काबुक्की न करता वातानुकूलित या 'श्रीं'च्या मंडपात येऊन गणरायाचं दर्शन घेत आहेत. टिळक नगरमधील सह्याद्री क्रीडा मंडळाचे खजिनदार जया शेट्टी यांनी ईटीव्ही भारतशी बातचीत केलीय. (Ganeshotsav 2023)