महाराष्ट्र

maharashtra

क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडनं घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

ETV Bharat / videos

Ruturaj Gaikwad Dagdusheth Ganpati Darshan : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड सपत्नीक दगडूशेठ गणपतीचरणी लीन, पाहा व्हिडिओ - दगडूशेठ गणपती

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 5:00 PM IST

पुणेRuturaj Gaikwad Dagdusheth Ganpati Darshan : यंदा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात गणेश उत्सवाला सुरुवात झालीय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत आहेत. तसंच विविध मान्यवर देखील बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामने सुरू आहेत. भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यानं सपत्निक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. अनेक राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रिटींनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलंय. रोज असंख्य भाविक बाप्पाचरणी लीन होत आहेत. यावेळी ऋतुराज गायकवाडने सपत्नीक गणपती बाप्पाची आरती केलीय. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे  (Ganeshotsav 2023). राज्यासह इतर देशांत आणि परदेशातही गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय.

ABOUT THE AUTHOR

...view details