Fake Bank Employee Arrested: बँक कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकांना लुटले, 49 गुन्हे करणाऱ्यांना अटक - Robbed customers
पुणे :तुम्हाला जर कोण बँक कर्मचारी आहे म्हणून विश्वास देऊन आर्थिक व्यवहार करत असेल तर सावधान. कारण पुणे पोलिसांनी अशाच एक टोळीला पकडले असून ते बँकात व्यवहार करणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन पैसे बदलून देतो म्हणून पसार व्हायचे. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांकडील रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दीपककुमार मेहंगी असे अटक आरोपीचे नाव असून सुनील गर्ग आणि सुरजकुमार मेहंगी हे त्याचे साथीदार आहेत. लष्कर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या आरोपींनी महराष्ट्रातील 17 गुन्ह्यांसह देशभरात एकूण 49 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. हे आरोपी बँकेतून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील नोटा खराब असल्याचे सांगायचे. त्यानंतर कॅशियर कडून नोटा बदलून आणतो असे सांगत नोटांचे बंडल घेऊन पसार व्हायचे. अशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत देशभरातील विविध बँकांमधून ग्राहकांजवळील लाखो रुपये लंपास केले आहेत.