महाराष्ट्र

maharashtra

Rishikesh Road Accident

ETV Bharat / videos

Rishikesh Road Accident : हायवेच्या मधोमध मस्ती करणाऱ्या तरुणाला भरधाव कारनं उडवलं, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ - उत्तराखंडच्या ऋषिकेश

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 6:48 PM IST

ऋषिकेश Rishikesh Road Accident :उत्तराखंडच्याऋषिकेश येथे एका रस्ता अपघाताचा भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण रात्री उशिरा हरिद्वार रोडवर मस्ती करत होता. दरम्यान, समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या लाल रंगाच्या कारनं त्याला जोरदार धडक दिली. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री घडली, जिचा व्हिडिओ नुकताच समोर आलाय. या अपघातात हा तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तेथून त्याला एम्स ऋषिकेश येथे नेण्यात आलं. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनीच कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी मृताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापपर्यंत चालकाचा शोध लागलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details