Ancient Trading Market: 'या' ठिकाणी सापडली दोन हजार वर्षापूर्वीची पुरातन व्यापारी बाजारपेठ - Researchers found ancient trading market at Kotul
अहमदनगर :अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दोन हजार वर्षापूर्वीची पुरातन व्यापारी बाजारपेठ संशोधकांना सापडली आहे. पुणे विद्यापीठाच्या डेक्कन पुरातत्वीय विभागाचे 50 प्रशिक्षणार्थी तज्ज्ञ संशोधन करत आहेत. अनेक पुरातन वस्तू सापडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ गावात संशोधकांना दोन हजार वर्षापूर्वीची बाजारपेठ सापडली आहे. कौतूळ येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी भाऊसाहेब देशभुख यांच्या शेतात हे उत्खननाचे काम सुरू आहे. डॉ. पांडुरंग साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 विद्यार्थ्यांची टिम उत्खनन करत आहे. गेल्या वर्षी काही अवशेष सापडल्याने त्यांनी पुन्हा उत्खननाचे काम सुरू केले आहे. पहिल्या आणी दुसर्या शतकातील वस्तू आणी बाजापेठ त्यांना सापडली आहे. गेल्या सात दिवसांपासून झालेल्या संशोधनात प्राण्यांचे अवशेष, चुली, मातीची भांडी, सिलिकेट मणी, शंखाच्या बांगड्या मातीची आठशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक काळातील सुरई भांडे अशा वस्तू सापडल्या आहेत. कोतूळ येथील एक किलोमीटर लांब आणि अर्धा किलोमीटर रुंद अशी सातवाहन काळातील बाजारपेठ असल्याचे पुरावे सापडले आहेत.