UP Tiger Resque : नदीच्या भोवऱ्यात अडकलेल्या वाघाला जीवदान मिळाले - UP Tiger Resque
लखीमपूर खेरी येथील दुधवा व्याघ्र प्रकल्पातील कर्तनियाघाट वन्यजीव अभयारण्यात नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या एका वाघाला जीवदान ( Tiger Resque ) देण्यात आले. घाघरा नदीच्या भोवऱ्यात हा वाघ अडकला होता. दुधवा व्याघ्र प्रकल्पातील कर्तनियाघाट वन्यजीव अभयारण्यात घाघरा नदीच्या भोवऱ्यात अडकलेल्या वाघाला वाचविण्यासाठी शुक्रवारी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली. दुधवा व्याघ्र प्रकल्प प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घागराच्या ओढ्यात अडकलेल्या वाघाची सुटका करण्यात आली. या यशस्वी बचाव मोहिमेबद्दल दुधवा क्षेत्र संचालक संजय पाठक यांनी दुधवा पार्क प्रशासन आणि या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST