अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाखांचं बक्षीस, रेखा महेश तौर यांची घोषणा - Ten Lakh reward for tear Abdul Sattar clothes
जालना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा राष्ट्रवादीच्या रेखा महेश तौर यांनी केली आहे. रेखा महेश तौर या असंघटीत कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रीया ताई सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे आज राज्यभरात पडसाद उमटले असून ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. त्याचबरोबर सत्तार यांचे जो कुणी कपडे फाडेल त्याला दहा लाख रुपये बक्षीस दिले जाईल अशी घोषणाचे रेखा महेश तौर यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST