महाराष्ट्र

maharashtra

रेड्याच्या वाढदिवसाला जबरदस्त सेलिब्रेशन

ETV Bharat / videos

Reda Birthday: जरा हटके ! रेड्याच्या वाढदिवसाला जबरदस्त सेलिब्रेशन, खमंग पदार्थांच्या मेजवानीसोबत फटाक्यांची आतिषबाजी - रेड्याचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 10:44 PM IST

ठाणेReda Birthday: विविध पाळीव प्राण्यांची बहुतांश लोकांना खूपच आवड असते. त्यामुळे घरातील मंडळी सदस्यांप्रमाणेच त्या (Titya birthday) पाळीव प्राण्यांची काळजी घेत असल्याचे आजपर्यंत आपण पहिले असेल. इतकंच नाही तर त्यांचे वाढदिवस देखील साजरे करतात. (Tandels living in Lakhivali village) असाच एक अनोखा वाढदिवस सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा वाढदिवस होता एका रेड्याचा. (Tandel family) होय ज्याचं नाव 'टीट्या' आहे. त्याचा वाढदिवस अख्ख्या गावाने साजरा केला. जणू एखाद्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणेच पूर्ण गावाने जल्लोश केला. आता त्या रेड्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडेल की, खरंच हा एखाद्या रेड्याचाच वाढदिवस होता का?
 

भिवंडी तालुक्यामधील लाखीवली गावात राहणारे तांडेल यांचा हा रेडा असून त्याचा तिसरा जंगी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. तांडले कुटुंबाचे या रेड्यावर खूप प्रेम आहे. हा रेडा झुंज खेळण्यात पटाईत असून त्याने आतापर्यंत अनेक झुंजी खेळून पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे दरवर्षी ते या लाडक्या 'टीट्या'चा वाढदिवस असाच जल्लोषात साजरा करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 'टीट्याचा' वाढदिवस २८ सप्टेंबर रोजी होता. त्याला वाढदिवशी सजवलं जाते. त्याच्यासाठी खास आवडते पदार्थ तयार केले जातात. खास केकही तयार केला. एवढंच नाही तर पूर्ण गावाला जंगी पार्टी दिली जाते. रात्री फटाक्यांची आतिशबाजी करून जोशात त्याचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. अशाच प्रकारे याही वर्षी 'टीट्या'चा वाढदिवस साजरा करण्यात आला. या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details