Ashadhi Ekadashi 2023: 27 वर्षाच्या वारीचे सार्थक झाले, मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळालेल्या वारकरी कुटुंबाच्या भावना अनावर
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडकी या गावच्या वारकरी कुटुंबाला मिळाला आहे. वडकीतील भाऊसाहेब काळे आणि मंगला काळे यांनी विठ्ठलाची सपत्निक पूजा केली आहे. भाऊसाहेब काळे म्हणाले, 25 वर्षाची पांडुरंगाची सेवा करत असताना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचा आज आनंद आहे. पांडुरंगाकडे काही जास्त मागितले नाही. माझी वारी चुकू देऊ नको आणि तुझा विसर होऊ देऊ नको सगळ्यांना सुखी ठेव, हेच मागणे पांडुरंगाला मागितले. मंगला काळे यांनी सुद्धा ८३ सालापासून आमच्या घरी वारीची परंपरा आहे. त्या परंपरेचे भाग्य आम्हाला लाभले. आज मुख्यमंत्र्यांसोबत देवाकडे चांगला पाऊस पडू दे. सगळ्यांना सुखी ठेव. महाराष्ट्रातली जनता आहे त्या सर्वांना सुख मिळावे, असे मागणं पांडुरंगाला मागितले. मानाच्या वारकऱ्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून मोफत वर्षभर पास दिला जातो. यावर्षीच जेवढे तीर्थक्षेत्र आम्हाला फिरता येतील तेवढे तीर्थक्षेत्र फिरणार आहोत. या अगोदर सगळे तीर्थक्षेत्र फिरलो आहे. पण आता पास मिळालेला आहे. त्यामुळे आणखी एकदा फिरणार असल्यास भावना पती आणि पत्नी यांनी व्यक्त केली आहेत.